खांबाळे येथे कोरोना लसीकरण केंद्राचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके व सरपंच गौरी पवार यांचे हस्ते उद्घाटन

खांबाळे येथे कोरोना लसीकरण केंद्राचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके व सरपंच गौरी पवार यांचे हस्ते उद्घाटन

*कोकण Express*

*खांबाळे येथे कोरोना लसीकरण केंद्राचे शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके व सरपंच गौरी पवार यांचे हस्ते उद्घाटन*

*वैभववाडी  ः प्रतिनिधी*

खांबाळे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे सोमवारी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके व खांबाळे सरपंच गौरी पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
खांबाळे गावातील लोकांना लसीकरण करणेसाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालय किंवा आचिर्णे उपकेंद्र येथे जावे लागत होते. लोकांची गैरसोय दूर व्हावी व आपल्या लोकांना गावातच लस उपलब्ध होणेसाठी खांबाळे गावचे सुपुत्र शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांच्याशी संपर्क साधून
कोविड लसीकरण केंद्र सुरू करून ग्रामस्थांची समस्या दूर करावी अशी मागणी केली होती. त्यांच्याच मागणीनुसार खांबाळे केंद्रशाळा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

लसीकरण केंद्र खांबाळे गावात मंजूर करून घेण्यासाठी लोके यांनी विशेष प्रयत्न केलेत.

खांबाळे केंद्र शाळा येथे सोमवारी 90 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पुरविण्यात आले. त्याचा लाभ 45 वर्षे च्या वरील नागरिकांनी घेतला. गावातच कोविड लसीकरण होत असल्यामुळे खांबाळे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच गणेश पवार, माजी चेअरमन दीपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड, अमोल चव्हाण, बंडू गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके, जेष्ठ पत्रकार एकनाथ पवार, रुपेश कांबळे, दीपक पवार, दत्तात्रय परब, आरोग्य सहायक एकावडे, आरोग्यसेविका एस. ए. बोडेकर, आरोग्यसेविका श्रीमती आर. एस. भड, आशा स्वयंसेविका शामली देसाई, प्राची पवार, आरोग्य विभागाच्या चोचे मॅडम, स्वप्निल रेवडेकर, आचिर्णे उपकेंद्र मदतनिस श्रीमती वर्षा सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!