*कोकण Express*
*करूळ घाटात रविवारी सकाळी कोसळली दरड*
*पोलिसांनी दक्षता घेत वाहतूक केली सुरळीत*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
पावसाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. वाहन चालकांनी याची माहिती करुळ चेक नाक्यावर पोलिसांना दिली. वैभवावाडी पोलीस ठाण्यात माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनीच जेसीबीला मागवत जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड आदी उपस्थित होते.