*कोकण Express*
◾ *केंद्राचा नव्या गाईडलाईन्स ! – आता चिमुकल्यांना मास्कची गरज नाही, प्रत्येकाने वाचा*
◾ केंद्र सरकारने कोरोना महामारीदरम्यान 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी गाईडलाईन्स जारी केली आहे
◾ यानुसार लहान मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन अजिबात देऊ नये, तसेच 5 वर्षांखालील मुलांना मास्क लावण्याची गरज नाही, असे म्हटले आहे
◾ *आणखी कोणती काळजी घ्यायची ?*
🔰 मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्स नुसार – मुलांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊच नये – याव्यतिरिक्त सौम्य लक्षणांमध्ये ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांच्या आसपास असू शकते
🔰 याशिवाय घशात खवखव, श्वास घेताना, खोकताना त्रास जाणावणे यांचा समावेश आहे – जर ताप असेल तर पॅरासिटामोल गोळी देताना 4-6 तासांचे अंतर ठेवावे
🔰 तसेच खोकल्यासाठी गरम पाण्याच्या गुळण्या करा – आणि महत्वाचे म्हणजे विलगीकरणात गेलेल्या मुलांशी पालकांनी सकारात्मक चर्चा करावी
🔰 दरम्यान ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी मुलांना 6 मिनिट वॉक टेस्ट करा – असेहि मंत्रालयाने आपल्या गाईडलाईन्समध्ये सांगितले आहे.