*कोकण Express*
*माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे लॉटरी सेने तर्फे विविध सामाजिक लोक उपयोगी उपक्रमांचे आयोजन*
*सिंधुदुर्ग ः संंजना हळदिवे*
मनसेचे पक्ष प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे मनसे सैनिकांसाठी जनू काही सणच. सर्व राज्य भरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दर वर्षी मनसे लॉटरी सेने मार्फत राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध सामाजिक लोक उपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी सुद्धा मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक लोक उपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे.
● मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम व सरचिटणीस कल्पेश सावंत यांच्या सौजन्याने राज ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांच्या वृद्धाश्रमास दोन सोलर लाईटचे लोकार्पण
● मनसे लॉटरी सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क अध्यक्ष नितीन पवार यांच्या मार्फत शिरगाव येथे मोफत सोलर लाईट लोकार्पण
● नीतिन पवार यांच्या मार्फत वाफेच्या मशीनचे (स्टिमरचे) नाद ग्रामपंचायत, ओंबळ ग्रामपंचायत, शेवरे साईलवाडी ,कींजवडे येथे वाटप.
●मनसे लॉटरी सेनेचे कार्याध्यक्ष सुहास महाडिक, सरचिटणीस विनायक गोविलकर, चिटणीस संजय इंदप, सर्वेश ताठरे यांच्या मार्फत करीरोड व सात रस्ता येथे वृक्षारोपण कार्यक्रम
● कल्पेश सावंत, युवराज सावंत, अतिष शिखरे, प्रशांत पेंडुरकर, केतन शिखरे, यांच्या सौजन्याने वृक्षारोपण कार्यक्रमाचे अयोजन केले गेले आहेत.
●मनसे लॉटरी सेनेचे चिटणीस सूर्यकांत मयेकर यांच्या तर्फे वाकोला येथे वृक्षारोपण कार्यक्रम
● मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या मार्फत सेनापती बापट रोड येथे वृक्षारोपण कार्यक्रम
●मनसे लॉटरी सेनेचे देवगड तालुका अध्यक्ष अमित घाडी, रुपेश पांगम यांच्या सौजन्याने करोना प्रतिबंधक सोडियम हैपोक्लोराईडची फवारणी देवगड येथे करण्यात येणार आहे.
● मनसे लॉटरी सेनेचे दादर विभाग संघटक दिनेश पाटील यांच्या तर्फे दादर भाजी मंडई साठी ताप मोजण्यासाठी मोफत थर्मल गन देण्यात येणार आहे
●मनसे लॉटरी सेनेचे प्रसाद चिपकर यांच्या तर्फे कोविड रुग्णांना सकस आहाराचे वाटप
अश्या प्रकारे मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या संकल्पनेतून राज ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभर लोकपयोगी कार्यक्रमांचे आयोजनाचे करून साजरा करण्याचे ठरवले आहे.

