*कोकण Express*
*दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची सामाजिक बांधिलकी!*
*कणकवली नगरपंचायत विलगीकरण कक्षाला गाद्या, उशी, चादरी दिल्या भेट*
*कणकवली:- संजना हळदिवे*
कणकवली येथील दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपच्याने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दिले असून कणकवली न.पं.च्या 100 बेडच्या कोविड 19 संस्थात्मक विलगीकरण कक्षाला कोरोना रुग्णांसाठी गादी, उशी, चादरी भेट दिली आहे.
कणकवली न.पं.च्या पुढाकाराने भगवती मंगल कार्यालय येथे 100 बेडचे कोविड 19 संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या विलगीकरण कक्षाला दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपच्यावतीने 35 गादी, उशी, चादरी भेट म्हणून देण्यात आली. तर डॉ.विद्याधर तायशेटे यांच्यावतीने 15 गादी, उशी, चादरी देखील देण्यात आल्या.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, डॉ.विद्याधर तायशेटे, डॉ.पटेल व दिल दोस्ती दुनियादीरी ग्रुपचे दादा पावसकर, योगेश ताम्हाणेकर, गौरव मुंज, पिंटू महाडिक, चानी जाधव, विनू महाडिक, उमेश नाडकर्णी, मुन्ना वाळके, राकेश काणेकर, श्री.रावराणे सर्व सदस्य उपस्थित होते. तर दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपच्याने सामाजिक बांधिलकीचे भान राखत ही मदत देण्यात आली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

