सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी भाजपा करणार “लक्षवेध आंदोलन

सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी भाजपा करणार “लक्षवेध आंदोलन

*कोकण Express*

*राज्यात आजही सिंधुदुर्ग-रत्नागिरी रेड झोन मध्येच ; शिवसेनेचे सत्ताधारी आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे अपयश!*

 *सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी भाजपा करणार “लक्षवेध आंदोलन”* 

*आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आंदोलन गावागावात नेणार…*

*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा इशारा…*

*कणकवली :- संजना हळदिवे*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ दिवसात १२० लोकांनाच कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला.आज पर्यंत ८०३ जणांचे कोरोनाने बळी गेले तर रत्नागिरीत १४२८ लोकांचे कोरोनाने प्राण गेले.राज्यात आजही सिंधुदुर्ग-रत्नागिरी रेड झोन मध्येच आहे.हे शिवसेनेचे सत्ताधारी आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे अपयश आहे.कोणालाही विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने कारभार हकण्याने जनतेचे जीव जात आहे.कोरोना झालेल्या लोकांनां ना उपचार मिळत ना उपचार करण्यासाठी डॉक्टर किंवा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा स्थितीत विरोधी पक्ष गप्प बसणार नाही.

सरकारला जाग आणण्यासाठी उद्या ११ जून पासून जिल्हात “लक्षवेधआंदोलन” भारतीय जनता पार्टी करणार आहे. उद्या जिल्हा रुग्णालया बाहेर हे आंदोलन केले जाणार. जिल्हापासून, तालुका आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती विभाग व गावोगावी हे आंदोलन केले जाणार आहे असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.

ऑनलाईन पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी प्रशासनाच्या अपयशचा पाढा वाचला.यावेळी जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई,जिल्ह्या कार्यकारिणी चे सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रसन्न देसाई आदी उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले,  मुंबईत कोरोनाचा आकडा कमी झाला मात्र सिंधुदुर्ग जिल्हात आजून वाढत आहे. मृत्यू सुद्धा वाढत आहेत. यासाठी टार्स फोर्स जिल्हात आणणे गरजेचे आहे. फिजिशियन प्रत्येक तालुक्यात असणे गरजेचे आहे.६०० कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. आणि सर्वांनचा सहभाग घेऊन उपाय योजना राबविणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री दौऱ्यावर आलेत मात्र त्याचा फायदा करून घेता आला नाही त्यांना खोटी माहिती देऊन फसवणूक केली हे असे किती दिवस चालणार आणि जनतेच्या जीवाशी खेळणार ? लोक मरतात याचे थोडीसुद्धा दुःख या सत्ताधाऱ्यांच्या मनात होत नाही.प्रत्येक गोष्टीत राजकार करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना लस देण्यास राजकारण करून खो घातला.आठ दहा दिवस रुग्णवाहिका थांबवून ठेवल्या,सरपंचाचे आम्ही भाजपा च्या वतीने किंवा जिल्हापरिषदेच्या वतीने विमा काढतो तर त्यातही हे खोडे घालत आहेत.असा आरोप राजन तेली यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!