*कोकण Express*
*मनसे मुळे आवाजवी कोरोना रुग्णांची बिले उकळणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले*
*मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री*
*कणकवली :- संजना हळदिवे*
काही खाजगी डॉक्टर मंडळींनी कोरोना महामारीत कोविड केंद्र चालु करण्याचा निर्णय घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना एक सुखद दिलासा मिळाला होता.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता भयभीत होऊन पूर्णतः हादरलेली आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागा सह शहरी भागात मोठ्याप्रमाणात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे जनता हतबल अवस्थेत आहे. कोरोना रुग्णाला आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर कमतरता, ऑक्सिजनची कमतरता, पुरेसे बेड उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत खाजगी डॉक्टरांनी घेतलेला कोविड केंद्राचा निर्णय नक्कीच जिल्हावासियांसाठी स्वागथार्य होता.
मात्र काही दिवसातच काही खाजगी कोविड केंद्र उभारणाऱ्या डॉक्टर मंडळींनी आपली सेवा ही फक्त पैशाच्या लालसेपोटी आहे. हे दाखवून दिले.शासनाच्या उपचार दराला केराची टोपली दाखवून भरमसाठ स्वरूपात बिले आकारून जनतेची लयलूट चालु केलेली आहे.बिल देखील देत नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे या बाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या. माजी आमदार जीजी उपरकर यांनी या बाबत गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाला जाग आणली.जिल्हा कोरोना नियंत्रण समितीची या बाबत कानउघाडनी केली.आता या सदर समितीने संबंधित डॉक्टर मंडळीची तपासणी चालु केली आहे संबंधित डॉक्टर मंडळीचे धाबे दणाणले असुन रुग्णांची बिला पोटी आकारलेल्या जादा रकमेची परतफेड केल्या शिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही. जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आवाहन आहे. रुग्णांनी, नातेवाईकांनी कोणतीही भीड कोणतीही भीती न बाळगता आपल्या असलेल्या तक्रारी मनसेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांकडे निर्भीड पणे द्या.