माझी वसुंधरा अभियानात कणकवली नगरपंचायत अव्वल

माझी वसुंधरा अभियानात कणकवली नगरपंचायत अव्वल

*कोकण Express*

*माझी वसुंधरा अभियानात कणकवली नगरपंचायत अव्वल…*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगर पंचायत कर्मचारी अधिकाऱ्यांचे केले कौतुक…*

*कणकवली:- संजना हळदिवे*

माझी वसुंधरा अभियान २०२० – २१ मध्ये महाराष्ट्र राज्यात कणकवली नगरपंचायत ने अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यभरातील १३२ नगरपंचायतीनी या अभियानात सहभाग घेतला होता. यात कणकवली नगरपंचायत ने ३८ व्या क्रमांकावर बाजी मारली आहे.
या अभियानात भूमि, वायू, जल, अग्नी व आकाश या सहा टप्प्यांमध्ये काम करून त्यातील कामाचे मूल्यमापन करण्यात आले होते. गेल्या वर्षी कोविड काळ असून देखील ज्या नगरपंचायतनी अभियानात उत्कृष्ट काम केले अशानगर नगरपंचायतींचा गौरव करण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने या अभियानाच्या माध्यमातून काम करण्यात आले होते. यात कणकवली नगरपंचायत ने १३२ नगरपंचायत मधून ३८ व्या क्रमांकावर आपली छाप उमटवली आहे. कणकवली नगरपंचायत ने केलेल्या कामाबद्दल नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे सर्व नगरसेवक यांनी नगरपंचायत कर्मचारी अधिकारी यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!