*कोकण Express*
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप..*
*माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला कार्यक्रम*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले की, कोरोना मुळे यावर्षी साध्या पद्धतीने हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यावर्षी कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना हात भार लावत यावर्षीचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. तसेच यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी म्हणाले की, यावर्षी ७ दिवस हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असून, कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना मदत करून साजरा केला जाणार आहे. अशी माहिती दिली आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शफिक खान, देवेंद्र टेंमकर, आशिष कदम, संतोष जोईल, अशोक पवार, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, बावतीस फर्नांडिस, दर्शना बाबर-देसाई, अर्षद बेग, राजू धारपवार, मनोज वाघमोरे, आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा, सुरेश वडार आदी पदाधिकारी उपस्थित होते.