*कोकण Express*
*सावंतवाडीत राजन तेलींच्या हस्ते पालिकेच्या कोरोना विलगीकरण कक्षाचा शुभारंभ…*
*शहरातील रुग्णांसाठी ९६ बेडची सुविधा…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील पालिकेच्या माध्यमातून सैनिक वसतिगृहात चालू करण्यात आलेल्या सुसज्ज कोरोना विलगिकरण कक्षाचा शुभारंभ आज माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला.दरम्यान या कक्षात ९६ बेड उपलब्ध केले आहेत.त्यामुळे शहरातील रुग्णांना चांगली सेवा मिळेल,असा विश्वास याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर,नरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,सुधीर आडीवरेकर,परिमल नाईक,दीपाली भालेकर, दीपाली सावंत,भारती मोरे,शुभांगी सुकी अजय गोंदवले,बंटी पुरोहित, दीपक म्हापसेकर आदी उपस्थित होते.