*कोकण Express*
*झाराप रेल्वे स्टेशन परिसरात मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या डब्याला आग..*
*कुडाळ ःप्रतिनिधी*
झाराप रेल्वे स्टेशन परिसरात मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या डब्याला आग लागली.या आगीत डबा पूर्णत: जळून खाक झाला आहे.हा प्रकार आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे.सावंतवाडी पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.दरम्यान मालवाहतूक करणारा डबा असल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही,असे त्यांचे म्हणणे आहे.