*कोकण Express*
*मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचेवतीने जिल्हा रुग्णालय परिचारकांसाठी अत्याधुनिक चहा-कॉफी मशीन भेट.*
*समस्त महाराष्ट्र सैनिकांच्या माऊली सौ शर्मिला राज ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने मनसेकडून कर्तव्यनिष्ठ परीचारकांचा सन्मान..*
*जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते मशिनचे उद्धाटन..*
*सिंधुदूर्ग/प्रतिनिधी:-*
आज दि. 8 जून 2021 रोजी सौ शर्मिला राज ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मनसेच्या वतीने मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हा रुग्णालयात प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या परिचरिकांसाठी अत्याधुनिक चहा-कॉफी मशीन भेट दिली.जिल्हा शल्य चिकित्सक श्री.श्रीपाद पाटील यांचे हस्ते मशीनचे औपचारिक उद्धाटन करण्यात आले.
♦️यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,मालवण विनोद सांडव, जिल्हा सचिव बाळा पावसकर,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,निखिल गावडे आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.या मशीनच्या माध्यमातून मनसेने केलेल्या सन्मानाने परिचारकांनी मनसेचे आभार व्यक्त केले.