*कोकण Express*
*नांदगाव प्रा. आ. केंद्राला रुग्णवाहीका मिळावी*
*नांदगाव शिवसेना शाखेची खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे हायवे पासून जवळ व मध्यवर्ती ठिकाणी आहे. या केंद्राला जोडून 6 उपकेंद्र असून त्यांना जोडून जवळपास 25 च्या आसपास गावे आहेत. तसेच हे आरोग्य केंद्र मुंबई-गोवा महामार्गालगतच असल्याने अपघातांच्या वेळी रूग्णवाहीका तातडीने उपलब्ध होत नाही. म्हणून नांदगाव प्रा. आ. केंद्रासाठी रुग्णवाहिका देण्यात यावी, अशी मागणी नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर व युवा सेना शाखाप्रमुख प्रफुल्ल तोरस्कर यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.
नांदगाव परिसरात कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. या रुग्णांना ने-आण करण्यासाठी रूग्ण वाहीकेची गरज असून नांदगाव केंद्राला २०१२ साली रूग्ण वाहीका देण्यात आली होती. ती आता नादुरूस्त असून त्याचे पार्ट सुध्दा मिळणे अवघड झाले आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नांदगाव प्रा. आ. केंद्राला रूग्णवाहीका देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेद्वारे खासदार विनायक राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते.