*कोकण Express*
*श्रेयवाद नको,त्या रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राकडे द्या…*
*राजन तेली; पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी भाजपाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन…*
*सिंधुदुर्गनगरी ता.०८:*
जिल्ह्यातील लोकांचे रुग्णवाहीके अभावी जीव जात आहेत.त्यामुळे केवळ श्रेयासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी अडवून ठेवलेल्या “त्या” रुग्णवाहिका आवश्यक प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ सोडाव्यात,अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केली.दरम्यान एकीकडे अनेक लोकांचे जीव जात आहेत.मात्र पालकमंत्र्यांना त्याचे सोयरसुतक नाही.हा सर्व प्रकार चुकीचा आहे,असाही टोला त्यांनी यावेळी लगावला।याबाबत भाजपच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी श्री.तेली यांनी पालकमंत्र्यांचा निषेध केला.