*कोकण Express*
*आशिये ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना बाधितांसाठी उभारला विलगीकरण कक्ष…*
*कणकवली :- संजना हळदिवे*
आशिये गावातील कोरोना बाधित नागरिकांसाठी ग्रामपंचायतच्यावतीने ग्राम विलगीकरण कक्ष उभारण्यात आहे.आशिये दत्तमंदिर येथील भक्त निवासात १० बेडचे विलगीकरण कक्ष करण्यात आला असून त्याचा शुभारंभ माजी उपसभापती तथा भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती महेश गुरव,भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत,सरपंच शारदा गुरव,उपसरपंच संदीप जाधव,प्रवीण ठाकूर,निलेश ठाकूर,पोलीस पाटील गुरुनाथ खानोलकर,तलाठी निलिमा सावंत,समीरा ठाकूर,ग्रामपंचायत कर्मचारी दुर्वा जाधव,प्रियंका कोरगावकर, विनोद ठाकूर,कोतवाल गणपत तेली आदी उपस्थित होते.