*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद देणार सरपंचाना “विमा कवच”…*
*राजन तेलींची माहिती ; संकल्पनेला तत्वतः मान्यता, ४२१ जणांना मिळणार लाभ…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा विमा उतरविण्यास जिल्हा परिषदने तत्वतः मान्यता दिली आहे.याबाबत आज चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यामुळे असा निर्णय घेणारा हा राज्यातील पहिलाच जिल्हा असणार आहे.अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.दरम्यान जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून हे विमे उतरविले जाणार असून तब्बल ४२१ सरपंचांना याचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत श्री.तेली यांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधला.