*कोकण Express*
*आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून वरवडे प्राथ.आरोग्य केंद्राला मिळाली ॲम्ब्युलन्स*
*सभापती मनोज रावराणे यांनी केले उद्घाटन*
*कणकवली :- संजना हळदिवे*
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रला नवीन ॲम्ब्युलन्स मिळाली असून नवीन ॲम्ब्युलन्सचे उदघाटन पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, माजी उपसभापती महेश गुरव, सोनू सावंत, संदीप मेस्त्री, वरवडे सरपंच प्रभाकर बांदल, शिरवल सरपंच महेश शिरवलकर, स्वप्नील चिंदरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, सुभाष मालंडकर, आनंद घाडी, जितू कांबळी, सायली पवार, विनिता बुचडे, श्रद्धा कदम, हेलन कांबळी, सचिन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.