*कोकण Express*
*पनवेल विमानतळाला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव द्यावे…*
*माजी आम.प्रमोद जठार यांचे ट्विटद्वारे मागणी*
*कणकवली :- संजना हळदिवे*
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे की लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यायचे यावरून जोरदार रणकंदन सुरू असतानाच आता कणकवली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी ट्विट करीत पनवेल विमानतळाला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव द्यावे असे सुचवीले आहे. माजी आम.प्रमोद जठार यांनी पनवेल विमानतळाला आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे द्यावे असे सुचविल्याने आता आणखी एका नावाची भर पडली असून नामकरण काय होते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
