*कोकण Express*
◾ *सकाळचे बातमी अपडेट / ०८ जून मंगळवार*
◾ राज्यातील कोरोनाचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे , काल दिवसभरात राज्यात 10 हजार रुग्णांची नोंद झाली
◾ आयकर विभागाने आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे – कोरोनामुळे आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख – सातत्याने वाढवण्यात आली होती –
◾ त्यानुसार येत्या 30 जूनपर्यंत आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड बंद होईल
◾ कोकणातील सर्व जिल्ह्यात येत्या ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे – सर्व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांनी सतर्क रहावे – असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत
◾ केंद्र सरकार कडून सर्व राज्यांना मोफत लस मिळणार – अशी घोषणा पंतप्रधान मोदीं यांनी केली आहे – त्यानुसार 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल
◾ निकाल अपडेट – CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2019- पेपर I चा निकाल जाहीर – bit.ly/3pvLhhw
◾ तसेच येत्या दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार असल्याची मोठी घोषणा – काल पंतप्रधान मोदीं यांनी केली आहे
◾ पेट्रोल-डिझेलची जुलमी दरवाढ मागे घ्या अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करू – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा मोठा इशारा
◾ दोन डोस पूर्ण केलेल्या प्रवाशांना शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यास – रेल्वे प्रवाशांना प्रवास करू दिला जाईल – असे रेल्वे प्रशासनाने काल स्पस्ट केले