सावंतवाडी पालिकेने “माझी वसुंधरा” अभियानात जिल्ह्यात प्रथम तर महाराष्ट्र राज्यात १७ वा क्रमांक

सावंतवाडी पालिकेने “माझी वसुंधरा” अभियानात जिल्ह्यात प्रथम तर महाराष्ट्र राज्यात १७ वा क्रमांक

*कोकण Express*

*सावंतवाडी पालिकेने “माझी वसुंधरा” अभियानात जिल्ह्यात प्रथम तर महाराष्ट्र राज्यात १७ वा क्रमांक* 

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

”माझी वसुंधरा” अभियानात येथील पालिकेने जिल्ह्यात प्रथम तर महाराष्ट्र राज्यात १७ वा क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे सावंतवाडी नगरषरिदेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या अभियानासाठी सावंतवाडी शहरातील वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्रम राबविण्यात आले होते.
यासाठी नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब, आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी, कार्यालयिन निरिक्षक आसावरी शिरोडकर व सर्व अधिकार, कर्मचारी यांनी मेहनत घेतली होती.राज्यात १७ वा क्रमांक तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल नगराध्यक्ष संजू परब आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे सर्वस्तरातून अभिनंदन केलं जातं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!