साकेडी येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे लोकार्पण!

साकेडी येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे लोकार्पण!

*कोकण Express*

*साकेडी येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे लोकार्पण!*

*आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांचा सन्मान करा…!*

*जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांचे आवाहन…!*

*जमातुल मुस्लमीन संस्थेकडून तीन ऑक्सीजन सिलेंडर प्रदान!*

*कणकवली:- संजना हळदिवे*

गाव पातळीवर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची अजुनही प्रभावी जनजागृती होण्याची गरज आहे. अनेकांमध्ये लस घेतल्यानंतर ताप येतो किंवा अन्य साईड-इफेक्ट दिसतात असा समज आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता जास्तीत जास्त लसीकरण करावे. व कोरोनाला हद्दपार करण्याकरिता साथ द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी हे तुमच्या घराजवळ आल्यानंतर काही ठिकाणी त्यांचा अपमान केला जात असल्याचा प्रकार समोर आले आहेत. मात्र, असे करू नका. ही सर्व लोक तुमच्यासाठी गेली दीड वर्ष झटून काम करत आहेत. त्यांना सन्मान द्या. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या. असे आवाहन सौ. सावंत यांनी केले.

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असताना कोविड पॉझिटिव्ह आलेल्या पण लक्षणें नसलेल्या रुग्णांसाठी या विलगीकरण कक्षांची निर्मिती करण्यात येत आहे. रुग्णांनी या विलगीकरण कक्षांचा उपयोग करून घेत पॉझिटिव्ह आल्यास दुर्लक्ष करू नका. असे आवाहन देखील सौ सावंत यांनी केले. साकेडी ग्रामपंचायत मार्फत वरचीवडी शाळेमध्ये करण्यात आलेल्या या विलगीकरण कक्षाचा सुदैवाने वापर होऊ दे नको. मात्र, जर पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर मात्र घराजवळ थांबू नका असे आवाहन सौ. सावंत यांनी केले. साकेडी मुस्लिमवाडी मधील जमातुल मुस्लमीन यांच्यावतीने विलगीकरण कक्षा करिता तीन ऑक्सिजनचे सिलेंडर देण्यात आले आहेत. संस्थेने सामाजिक भान जपत हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करायला हवे. प्रत्येकाने आता आपला असा खारीचा वाटा उचलून यात सहभाग वाढवा. असे आवाहन देखील सौ. सावंत यांनी केले. यावेळी जमातुल मुस्लमीन साकेडी च्या वतीने तीन ऑक्सीजन सिलेंडर व दोन कनेक्टर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते सरपंच यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांचा जिल्हा परिषद च्या वतीने साकेडी उपकेंद्रांमध्ये लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आल्याबद्दल गावच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती संजय शिरसाट, सरपंच रिना राणे, उपसरपंच मोहम्मद जहुर शेख, तलाठी योजना सापळे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ ढवण, आनंदी परब, किशोरी तेली, ग्रामसेवक संजय तांबे, पोलीस पाटील कासम शेख, तंटामुक्त अध्यक्ष मुरारी राणे, आरोग्य सेविका एस व्ही मेस्त्री, आशा सेविका वैशाली गुरव, अंगणवाडी सेविका उषा गाड, राजू सदवडेकर, रमाकांत सापळे, आप्पा लाड, सहदेव लाड, अजित शिरसाट,जमातुल मुस्लमीन साकेडी चे रहुफ शेख, अकबर शेख, हुसेन खान, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रीना राणे यांनी तर सूत्रसंचालन वैशाली गुरव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!