*कोकण Express*
*सिंधुदुर्गात राजकीय विरहीत कार्यक्रम….*
*कणकवली मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमा कवच संरक्षण…*
*आ. नीतेश राणे यांचा सुत्य उपक्रम ; तीन लाखाचे विमा संरक्षण…*
*कणकवली :- संजना हळदिवे*
राज्य शासनाने सिंधुदुर्गातील सर्व सरपंचांचा विमा उतरवण्याचा शब्द दिला होता. पण तो पूर्ण केला नाही. पण हा शब्द फक्त वापरायचा पूर्णता सत्यात उतरवायचा नाही असे राज्य शासनाचे धोरण आहे. या कोरोनाच्या महा मारीत बऱ्याच सरपंचांचा मृत्यूह झालेला आहे. कोवीड च्या काळात आपला जीव धोक्यात घालून सरपंच अतोनात प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्यांना विमा कवच देणे आवश्यक आहे यासाठी मी चोलामंडलम एमएस या कंपनीचा विमा प्रत्येक सरपंचाचा तीन लाखाचा असा एक वर्षासाठी आहे. एक वर्षाच्या आत म्हणजे चार किंवा पाच महिन्यात तीन लाख खर्च करून टाकले तर परत तीन लाख पुन्हा विमा कवच मिळणार.
मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलंय. त्या सर्वांचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवणार असल्याची ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी आज दिली. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.
राणे म्हणाले,कोरोना काळात सरपंच मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सरपंचांचा मृत्यूही झाला आहे. परंतु शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र लोकप्रतिनिधी या नात्याने मी सरपंचांची जबाबदारी घेत असून पक्षभेद न पाहता सर्वच सरपंचांचा विमा ती उतरवणार आहे अशी ग्वाही श्री.राणे यांनी दिली.

