*कोकण Express*
*खांबाळे ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुळवाडीभूषण, रयतेचा राजा, राजाधिराज योगीराज, *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या *शिवराज्याभिषेक सोहळा* निमित्त ग्रामपंचायत खांबाळे येथे *शिवराज्याभिषेक दिन* साजरा करून मानवंदना देण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, ग्रामसेवक जी. डी. कोकणी,माजी चेअरमन दीपक चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रविण गायकवाड, बंडू गुरव,अमोल चव्हाण, रुपेश कांबळे,दीपक पवार, दत्तात्रय परब, ग्रामरोजगार सेवक मंगेश कांबळे, ग्रा.पं. नळकर्मचारी अंबाजी पवार, शिपाई सदानंद पवार, छोटू गुरव, शुभम पवार, मेघनेश पवार आदी उपस्थित होते.