*कोकण Express*
*कितीही विरोध केला तरी प्रत्येक पत्रकाराचे लसीकरण होणारच*
*कणकवलीः संजना हळदिवे*
कोणीही कितीही राजकारण केले तरी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराचे लसीकरण होणारच.येथे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची जिल्हापरिसदेवर सत्ता आहे.अशक्य ते शक्य करून दाखवले आहे.असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कोणते ही राजकारण न करता जनतेची सेवा करत आहे. पण राजकारण नेमके कोण करतय याचा विचार जनतेने करावा. तसेच जि.प.चे सीईओ तरुण व नवीन असून त्यांना अनुभव थोडा कमी आहे. त्यांना कदाचित माहीत नसावे गेले २५ वर्ष सिंधुदुर्गाच्या जि.प.मध्ये राणे साहेबांचे वर्चस्व आहे. अशा सीईओना चांगली शिकवण कशी द्यायची हे आम्हाला माहिती आहे.
आमच्या जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराचे लसीकरण होणारच, असे संगतानाच त्यांच्या अनुभवात भर येणाऱ्या दिवसात निश्चित टाकू. असे आम. नितेश राणे पत्रकारांच्या लसीकरणाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. यावेळी जि.प.अध्यक्षा संजना सावंत, सभापती मनोज रावराणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.