*कोकण Express*
*कोरोना काळात देवगड पडेल गावचे मनसेचे ग्रामपंचायत सदस्य अमित घाडी यांचे आदर्शवत समाजसेवेचे काम*
*देवगड ः प्रतिनिधी*
किरोनाच्या प्रादुर्भावा मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. त्यात देवगडच्या पडेल गावात सुद्धा कोरोना रुग्ण वाढत आहेत. अपुऱ्या आरोग्य यंत्रणे मुळे कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण धास्तवले त्या मुळे संपूर्ण गावच भयभीत झाले. परंतु या कठीण काळत मनसे लॉटरी सेनेचे तालुका अध्यक्ष व पडेल गावचे ग्रामपंचायत सदस्य अमित घाडी मोठ्या जोमाने समाजकार्य करीत आहेत. अमित घाडी स्वतः च फवारणी मशीनद्वारे गावात सोडियम हैपोक्लोराईडची फवारणी करीत आहेत. स्वतः च पीपीई किट घालून गावातील कोरोना रुग्णांना डॉक्टरां जवळ घेऊन जाणे व घरातील विलिगीकरणातील लोकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार करीत आहेत. मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, संपर्क अध्यक्ष नितीन पवार यांच्या मदतीने या कोरोना काळात समाजसेवेचा धडाका लावल्या मुळे अमित घाडी यांनी जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायत सदस्यांपूढे आदर्श ठेवला आहे. अशा या निस्वार्थी कोविड योध्याचे समाज्याच्या सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.