कणकवली न.पं.ने १०० बेडचे कोविड सेंटर उभारून राज्यात आदर्श निर्माण केला; आम.नितेश राणे

कणकवली न.पं.ने १०० बेडचे कोविड सेंटर उभारून राज्यात आदर्श निर्माण केला; आम.नितेश राणे

*कोकण Express*

*कणकवली न.पं.ने १०० बेडचे कोविड सेंटर उभारून राज्यात आदर्श निर्माण केला; आम.नितेश राणे*

*भाजप कार्यकर्ते विकासात राजकारण करत नाही; विरोधकांना लगावला टोला!*

*नगराध्यक्ष समीर नलावडे, त्यांच्या टीमचे केले कौतुक!*

*कणकवली:- संजना हळदिवे*

२५ बेडचे सर्वसोई सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारून कणकवली न.पं.ने केवळ जिल्ह्यासमोरच नव्हे, तर राज्यात आदर्श निर्माण केला. आता १०० बेडचे संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन करून कणकवली नगरपंचायतीचे काम राज्यात आदर्शवत असल्याचे दाखवून दिले आहे. तसेच भाजपा कार्यकर्ते विकासात राजकारण करत नाहीत. तर दिलेला शब्द पाळतात हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. असा टोला लगवताना नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीमही प्रशासनाच्या साथीने करत असलेले काम अभिमानास्पद असल्याचे गौरउद्गार आम.नितेश राणे यांनी काढले.

भगवती मंगल कार्यालय येथे न.पं.च्या माध्यमातून 100 बेडचे कोरोना विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी आम.नितेश राणे, जि.प.अध्यक्षा संजना सावंत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्य बंडू हर्णे, सभापती मनोज रावराणे, तहसीलदार रमेश पवार, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक विराज भोसले, शिशिर परूळेकर, किशोर राणे, महेश सावंत, पं.स.सदस्य मिलिंद मेस्त्री, व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, रोटरीचे अँड.दीपक अंधारी, न.पं.कर्मचारी किशोर धुमाळे, मयूर शिंदे ,मनोज धुमाळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

आम.राणे पुढे म्हणाले, कणकवली मधील नागरिकांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना मतदान करून आमच्यावर जो विश्वास टाकून निवडून दिले. त्यामुळेच जेनसेवेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम करत आहेत. विधायक कामाला आमचा नेहमीच पाठिंबा असेल असे सांगताना कणकवलीतील समस्या भाजपच्या माध्यमातून सोडवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!