*कोकण Express*
*विस्थापित नवीन कुर्ली गावठणातील शाळेच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी*
*आमदार नितेश राणेच्या मार्गदर्शनाखाली सभापती मनोज रावराणे यांच्या फंडातुन शाळेच्या पटांगणावर बोअरवेल मंजुर..*
विस्थापित नवीन कुर्ली पुर्नवसन गावातील मुलभुत समस्यांपैकी पाणी ही एक प्रमुख समस्या असताना आणि गेली कित्येक वर्षे जि.प. पुर्व प्राथमिक शाळा नवीन कुर्ली येथील भव्य पटांगणावर जिल्हा परिषदच्या बीट स्तरावरील व तालुका स्तरावरील विविध स्पर्धाचे आयोजन होत असताना यावेळी प्रामुख्याने गावातील नळपाणी योजनेच्या माध्यमातुन मिळणारे पाणी पुरेसे नसल्याने अनेक वेळा अडचण निर्माण होत असे. कणकवली विधानसभेचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांना गावातील ‘नवदुर्गा युवा मंडळ’ (रजि.) यांचे पदाधिकारी व कार्यकत्ये यांनी सदर बाब निर्दशनास आणुन बोअरवेलची मागणी केली होती. नवदुर्गा युवा मंडळाने केलेल्या मागणीचा ग्रामविकास मंडळाने सतत पाठपुरावा करत गतवर्षीच्या सार्वजनिक नवरात्रौत्सवाच्या कार्यक्रमात आमदार साहेब यांना सदर समस्येचे विवेचन केले असता येथील स्थानिक लोकप्रतिनिधी पं.स.सदस्य मनोज रावराणे यांनी त्वरीत माहिती घेवुन सदर समस्या लवकरात लवकर सोडवु अशी ग्वाही दिली.
ग्रामविकासाचा ध्यास घेवुन गावात नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ (रजि.) च्या माध्यमातुन सदर समस्याचा सतत पाठपुरावा करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रार्दुभाव व बोअरवेलचे काम उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळा पुर्वी होणे गरजेच असताना आज आमदार नितेश राणेच्या मार्गदर्शनाखाली पं.स.सदस्य व विद्यमान कणकवली सभापती मनोज रावराणे यांच्या स्थानिक विकास निधी फंडातुन नवीन कुर्ली येथे बोअरवेलचे उद्घघाटन करण्यात आले. ‘देवु तो शब्द पुरा करु…’ हे आमदार साहेबाचे नेहमीचे वाक्य व त्यासाठी त्यांच्या सोबत काम करणारे स्थानिक लोकप्रतिनिधीचे प्रयत्न याचा प्रत्यय तसेच कोरोनाच्या काळातही विकास कशा प्रकारे करु शकतो याचा जणु दाखलाच आज मतदारसंघातील व नवीन कुर्लीतील ग्रामस्थांना आला.
कोरोना कोवीड- १९ च्या कालावधीत सोशल डिस्टनचे सर्व नियम पाळुन बोअरवेल कार्यक्रमाचे उद्घाघाटन कणकवली सभापती श्री.मनोज रावराणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,यावेळी लोरे नं- १ सरपंच श्री.अजय रावराणे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र कोलते जि.प. पुर्व प्राथमिक शाळा नवीन कुर्लीच्या मुख्याध्यापिका श्रीमती.जोशी मॅडम, नवदुर्गा युवा मंडळाचे सल्लागार श्री.अरुणोदय पिळणकर, कृष्णा परब,शिवराम पोवार, हरेश पाटील,विजय परब, निलेश पोवार,भगवान तेली, राजेंद्र तेली,एकनाथ पोवार, आनंद सावंत,शिवाजी चव्हाण,दाजी मठकर,सत्यवान मेस्त्री आदी ग्रामविकास व युवा मंडळाचे सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यापुढे देखिल गावाच्या विकासासाठी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ (रजि.) व नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) एकत्रित पाठपुरावा करुन विविध समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असे सांगण्यात आले,मुलभुत पाण्याचा प्रश्न सुटल्याने यावेळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते.