*कोकण Express*
*कळसुली येथील ऍम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न…*
*कळसुली येथील ऍम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न*
*कणकवली : संजना हळदिवे*
गेले कित्येक दिवस मागणी असलेली कळसुली गावातील ऍम्ब्युलन्स आज कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल झाली. सदर ऍम्ब्युलन्स मिळावी यासाठी आमदार नितेश राणे आणि जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी पाठपुरावा केला होता. अँब्युलन्स मिळाल्याने आता लोकांची होणारी गैरसोय दूर झाली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. अँब्युलन्स लोकार्पण करताना आमदार नितेश राणे व संजना सावंत यांचे उपस्थितांनी आभार मानले. यावेळी पं. स. सभापती मनोज रावराणे यांनी श्रीफळ वाढवून तसेच अँब्युलन्सचे पूजन करून जि. प. सदस्या सायली सावंत यांनी अँब्युलन्सचे लोकार्पण केले. यावेळी उप सभापती प्रकाश पारकर, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री, शशी राणे, शिरवल सरपंच महेश शिरवलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, कळसुली उपसरपंच सचिन पारधिये, जयवंत घाडीगांवकर, समीर प्रभुगावकर, स्वप्नील गोसावी, समीर सावंत, राजू नार्वेकर, विकास कदम, दीपक मेस्त्री, राजा दळवी, रणजित घाडीगावकर, हेमंत वारंग, द्यानी फर्नांडिस, दत्ताराम घाडीगावकर, सत्यविजय परब, पंकज सावंत, भारती देसाई, दीपक तांबे, रुजाय फर्नांडिस, डॉ. भडांगे आदी उपस्थित होते.