हॉटेल, पर्यटन, सलून-ब्युटीपार्लर चालकांना विशेष दरात कर्ज देण्याचा निर्णय

हॉटेल, पर्यटन, सलून-ब्युटीपार्लर चालकांना विशेष दरात कर्ज देण्याचा निर्णय

*कोकण  Express*

*हॉटेल, पर्यटन, सलून-ब्युटीपार्लर चालकांना विशेष दरात कर्ज देण्याचा निर्णय*

कोरोना संकटाचा फटका बसलेल्या क्षेत्रांना विशेष अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केला. त्यानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंट, पर्यटन, पर्यटन व्यावसायिक, सहल आयोजक, खासगी बस चालक, वाहन दुरुस्ती, भाड्यानं वाहन देणारे, विविध कार्यक्रम आणि परिषदांचे आयोजन करणारे, सलून, ब्युटी पार्लर चालक आदींना याचा लाभ मिळणार आहे.

या क्षेत्राला कर्ज पुरवठ्यासाठी बँकेनं चालू आर्थिक वर्षाअखेरपर्यंत १५ हजार कोटी रुपये राखून ठेवले असून त्यांना मागणीनुसार कर्ज पुरवठा केला जाणार आहे. या कर्जाचा कालावधी ३ वर्षांपर्यंत असेल आणि त्यावर रेपो दरा इतकेच मध्ये सध्या ४ टक्के दरानं व्याज आकारलं जाईल.

यासाठी बँकांनाही रिझर्व्ह बँकेकडून सवलत दिली जाणार आहे. मध्यम, लघू, सूक्ष्म उद्योगांना सुलभ अर्थ पुरवठा व्हावा यासाठी सिडबीला आणखी १६ हजार कोटी रुपये भांडवल देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.

सध्या विविध प्रकारची सबसिडी किंवा वेतन, निवृत्तीवेतन, वीज, गॅस, दूरध्वनी, पाण्याचे बिल, वीमा हप्ता भरण्यासाठीची यंत्रणा केवळ कार्यालयीन दिवशीच कार्यरत होती.

नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस अर्थात, NACH असे या प्रणालीचे नाव आहे. ही प्रणाली आहात आठवड्याचे सर्व दिवस २४ तास कार्यरत राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!