*कोकण Express*
*कुर्ली येथे कोरोना लसीकरण केंद्राचे तहसीलदार रामदास झळके व शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांचे हस्ते उद्घाटन*
*वैभववाडीीः प्रतिनिधी*
कुर्ली येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.या लसीकरण केंद्राचे शुक्रवारी वैभववाडी तहसीलदार रामदास झळके व शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कुर्ली गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे.या गावात कोरोना संसर्गामुळे एस. टी. वाहतूक बंद आहे.त्यामुळे लसीकरण करण्यासाठी फोंडाघाट,अरुळे,वैभववाडी या लसीकरण केंद्रावर सर्वसामान्य नागरिकांना जाणे शक्य होत नव्हते.
कुर्ली सरपंच दर्शना पाटील व माजी उपसभापती तथा कुर्ली उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके व वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांच्याकडे कुर्ली उपकेंद्रात इंटरनेटची व्यवस्था आहे. इमारतही प्रशस्त आहे. या ठिकाणी कोविड लसीकरण सुरू करून ग्रामस्थांची समस्या दूर करावी अशी मागणी केली होती. या मागणीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, जि.प. सदस्या दिव्या पाचकूडे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे, कुर्ली उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लसीकरण केंद्र कुर्ली गावात मंजूर करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत.
कुर्ली आरोग्य उपकेंद्र येथे शुक्रवारी 100 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पुरविण्यात आले. त्याचा लाभ 45 वर्षे च्या वरील नागरिकांनी घेतला. गावातच कोविड लसीकरण होत असल्यामुळे कुर्ली ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
तहसीलदार रामदास झळके व शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी या लसीकरण केंद्राचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण, सरपंच दर्शना पाटील, उपसरपंच अंबाजी हुंबे,मंडळ अधिकारी पावसकर,मंडळ अधिकारी कदम, ग्रामसेवक रवींद्र गोसावी,गाव तंटामुक्ती अध्यक्ष नलिनी पाटील,ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पाटील,माजी उपसरपंच सूर्यकांत परब,पोलीस पाटील प्रदीप मो. पाटील,आरोग्य सहाय्यक एकावडे, आरोग्य सेविका मेस्त्री, आरोग्य सेवक बिडये, आशा सेविका पोवार, मदतनीस संजना गायकवाड, लिपिक महेश पाटील, डाटा ऑपरेटर दिव्या पाटील, कर्मचारी ज्ञानदेव पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.