कॉमेडी फेम भाऊ कदमांची न.पं. च्या कोविड सेंटरला सदिच्छा भेट

कॉमेडी फेम भाऊ कदमांची न.पं. च्या कोविड सेंटरला सदिच्छा भेट

*कोकण  Express*

*कॉमेडी फेम भाऊ कदमांची न.पं. च्या कोविड सेंटरला सदिच्छा भेट…!*

*कणकवली ः संजना हळदिवे*

मुक्काम पोस्ट सावडावचे (ता. कणकवली) महाराष्ट्राचे कॉमेडी किंग भाऊ कदम यांनी आज कणकवली न. पं.च्या कोविड सेंटरला भेट देत तेथील रुग्णांचे मनोबल वाढवले. तसेच न.पं.च्या सुसज्ज अश्या कोविड सेंटरची पाहणी करत न. पं.चे विशेष कौतुक केले.

दरम्यान, सर्वत्र कोरोनाचा थैमान चालू तर दुसरीकडे उपचारासाठी बेड सुद्धा मिळणे कठीण असताना कणकवली न. पं.ने प्रथमच उभारलेल्या सुसज्ज अश्या कोविड सेंटर बद्दल कौतुक करावे तेवडे कमीच. असे उद्गार भाऊ कदमांनी काढत. तेथे सेवा देत असलेल्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यानंतर कोविड सेंटर मधे उपचार सुरू असलेल्या रुग्णांशी चर्चा करत ‘तुम्ही लवकरच बरे व्हाल.’ अस म्हणत मनोबल वाढवले. तर दूसरी कडे येथील ग्रामीण भागात सर्वच डॉक्टर आणि आरोग्य सेवा देणारे योद्धा अतिशय चांगली सेवा देत आहेत. असे म्हणत श्री. कदम यांनी न. पं. तथा नगराध्यक्ष समीर नलावडे यांचेही विशेष कौतुक करत कोविड सेंटरला शुभेच्छा दिल्यात.

यावेळी कणकवलीतील 100 बेडचे अजुन १ कोविड सेंटर उभारले जात असूझ त्याची पाहणी भाऊ कदम यांनी करत माहिती घेतली. त्यानंतर नगरपंचायतला भेट याप्रसंगी दिली. यावेळी नगराध्यक्ष दालनात भाऊ कदमांचे स्वागत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. त्यावेळी न.पं.च्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल विशेष गौरवउद्गार काढले. तसेच आपल्या गावात देखील एवढे चांगले काम सुरू आहे. काही मदत लागल्यास ती करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, न.पं. मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते सजंय कामतेकर, रविंद्र गायकवाड, अड. विराज भोसले, नगरसेविका मेघा गांगण, योगिता राणे, प्रतिक्षा सावंत, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत, किशोर राणे, सिद्धेश महाजन, बंडू गांगण, राजू गवानकर कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!