*कोकण Express*
◾ *सकाळचे बातमी अपडेट / ०४ जून शुक्रवार*
◾ राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे – असे काल महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले
◾ राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यामध्ये 1 लाख युवकांना ॲप्रेंटीसशीपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार –
◾ तसेच पुढील पाच वर्षात 5 लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार मिळणार – असे काल ,रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले
◾SpiceJet offers एअरलाईन या विमान कंपनीने – भारतात काम करणाऱ्या हेल्थकेअर प्रोफेशनल्सना , त्यांच्या मूलभूत भाड्यात 30 टक्के सवलत देण्याची घोषणा केली – ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत लागू असेल
◾ राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी , बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आता , कोणत्या निकषांवर लागणार- याबाबत विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत
◾ राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, सध्या कोरोनामुक्तीचा दर ९४ टक्के आहे – तसेच देशात लसीकरणा बाबतीत राज्याचा प्रथम क्रमांक लागतो
◾छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजे ६ जून हा दिवस – संपूर्ण राज्यात *शिवस्वराज्य दिन* म्हणून साजरा केला जाणार – असे उदय सामंत यांनी सांगितले
◾ यामाहा कंपनीने आपल्या Yamaha FZ25 आणि Yamaha FZS25 – या दोन बाईक्सच्या किमतीत 19000 हजार रुपयांची घट केली आहे
◾ पुणे हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार – पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यामध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे.