शासनाने सरपंच, सनियंत्रण समितीच्या समस्या त्वरित सोडवाव्यात – अरविंद रावराणे

शासनाने सरपंच, सनियंत्रण समितीच्या समस्या त्वरित सोडवाव्यात – अरविंद रावराणे

*कोकण Express*

*शासनाने सरपंच, सनियंत्रण समितीच्या समस्या त्वरित सोडवाव्यात – अरविंद रावराणे*

*कोकिसरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी गावागावात सरपंच व संनियंत्रण समिती प्रामाणिकपणे काम करत आहे. शासनाने देखील सरपंच व समितीच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन. त्या त्वरित सोडवणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने या महामारीत जबाबदारीने वागले पाहिजे. लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. कोणीही घाबरून जाऊ नये. आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत आहोत. असे प्रतिपादन पं. स. उपसभापती अरविंद रावराणे यांनी केले.

कोकिसरे येथे ग्रामपंचायत व संनियंत्रण समिती यांच्या विद्यमाने माधवराव पवार कोकिसरे विद्यालय या ठिकाणी विलगीकरण कक्षाचे उद्घाटन तहसीलदार रामदास झळके व उपसभापती अरविंद रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील, डॉ. कुंभार, सरपंच दत्‍ताराम सावंत, उपसरपंच वसुधा आमरसकर, ग्रा.पं. सदस्य प्रकाश पांचाळ, प्रदीप नारकर, नेहा नारकर, समीक्षा पाटणकर, श्रीराम शिंगरे, दाजी पाटणकर, अनंत नेवरेकर, अनंत नांदलस्कर, नंदकुमार आमरसकर, मुख्याध्यापक विनोद गोखले, अशोक शिंगरे, ग्राम विकास अधिकारी संभाजी वाघमोडे, तलाठी श्रीमती बिरादार, तलाठी श्री. सावंत, आरोग्य सेविका गोसावी, मधु जाधव, पो. पा. समिधा सावंत, परेश सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. याठिकाणी वीस बेडचा विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे
फोटो – कोकिसरे येथे विलगीकरण कक्षाचा शुभारंभ करताना तहसीलदार रामदास झळके, उपसभापती अरविंद रावराणे व इतर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!