भाजपा कोविड सेंट उभारणार आहे, जागा उपलब्ध करून घ्या; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

भाजपा कोविड सेंट उभारणार आहे, जागा उपलब्ध करून घ्या; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष

*कोकण Express*

*भाजपा कोविड सेंट उभारणार आहे, जागा उपलब्ध करून घ्या; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोंना रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यु दर लक्षात घेता सद्य स्थितीत उपलब्ध असणारी व्यवस्था फारच अपुरी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निहाय ३ कोविड सेंटर भाजपा तर्फे उभारून देण्याचे ठरले आहे.या कोविड सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात राजन तेली म्हणतात. तौक्ते चक्रीवादळानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सिंधुदुर्ग दौरादरम्यान झालेल्या बैठकीत कोरोंना स्थितीचा आढावा घेत असता असे लक्षात आले की , ग्रामीण भागात कोविड सेंटरची आवश्यकता आहे. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधान सभा निहाय ३ कोविड सेंटर भाजपा तर्फे उभारून देण्याचे ठरले आहे. यासाठी आपल्या मार्फत शासकीय व मंगल कार्यालयाच्या जागा आपल्या मार्फत उपलब्ध करून देण्याचे मान्य केलेले होते.

तसेच त्यासाठी लागणारे वैद्यकीय सहकार्य म्हणजेच डॉक्टर , परिचारिका तसेच सरकारी दवाखाने यांचे सहकार्य देण्याचे आपण मान्य केले होते. तरी कोविड सेंटरसाठी लागणारी जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी . त्याच प्रमाणे जिल्ह्यातील वाढती कोरोंना रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यु दर लक्षात घेता सद्य स्थितीत उपलब्ध असणारी व्यवस्था फारच अपुरी आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान ५०० बेडचे कोविड सेंटर उभारावे त्यातील निम्मे म्हणजे २५० बेड हे ऑक्सीजन बेड असतील असे पहावे . भारतीय जनता पार्टी यासाठी आपल्या परीने मदत करेल . तरी वरील दोन्ही बाबींवर तातडीने कार्यवाही अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!