राज्य सरकारचा मोठा निर्णय ! अनाथ मुलांचा खर्च सरकार उचलणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! अनाथ मुलांचा खर्च सरकार उचलणार

*कोकण  Express*

◾ *राज्य सरकारचा मोठा निर्णय ! अनाथ मुलांचा खर्च सरकार उचलणार*

🪆 कोरोना मुळे अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी – त्याच्या नावावर पाच लाख रुपयांची मुदत रक्कम ठेवण्याचा –

◾ तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा खर्च उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय – काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

◾ *काय सांगितले राज्य सरकारने*

▪️ या निर्णयानुसार कोरोना संसर्गामुळे आई व वडील मृत्युमुखी पडले असतील- किंवा एका पालकाचा कोरोना मुळे आणि एका पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास मदत मिळेल

▪️ म्हणजे एका पालकाचा 1 मार्च 2020 पूर्वीच मृत्यू झाला असेल – आणि एका पालकाचा आता कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अश्या – अनाथ झालेल्या शून्य ते 18 वयोगटातील बालकांना या योजनेचा लाभ मिळेल

▪️ या योजनेनुसार अशा बालकाला बालगृहामध्ये किंवा संबंधित बालकांच्या नातेवाईंकाकडे देण्यात येईल -दरम्यान अशा दोन्ही पद्धतीत संबंधित बालकाच्या नावे –

▪️ पाच लाख रुपये मदत म्हणून ठेवण्यात येतील – ही रक्कम बालकांना त्यांच्या वयाची – 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासहित मिळणार – त्यावेळी या रकमेची बालकांना मदत होईल

◾ *राज्य सरकारने कोरोनामुळे* – अनाथ झालेल्या बालकांसाठी घेतलेला , हा निर्णय नक्कीच खूप महत्वाचा आहे – आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!