*कोकण Express*
*कणकवली पं. समितीच्या नुतन इमारतीची आम. नितेश राणेंनी केली पाहणी*
*कणकवली ः (संंजना हळदिवे)*
कणकवली पं. स. कार्यालयाच्या नुतन इमारतीची कणकवली मतदार संघाचे आम. नितेश राणे यांनी पाहणी केली. आज दि. ३ जून रोजी आम. नितेश राणे यांनी तालुक्यातील सर्व सरपंचांची बैठक कणकवली पं. स. येथील प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित केली होती. यात त्यांनी तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कणकवली पं. स. च्या नुतन इमारतीची पाहणी केली. तेथील सुखसुविधांचा आढावा घेतला.
यावेळी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, पं. स. सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका मेघा गांगण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशीर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, पं. स. सदस्य महेश लाड, पप्पू पुजारे, शिरवल सरपंच महेश शिरवलकर, करंजे सरपंच मंगेश तळवलकर, संदिप सावंत, महेश सावंत, राजू हिर्लेकर आदी उपस्थित होते.