सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोणाची?, भाजपची की राणेंची याचे उत्तर द्या

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोणाची?, भाजपची की राणेंची याचे उत्तर द्या

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोणाची?, भाजपची की राणेंची याचे उत्तर द्या…*

*लसीकरणासाठी शिवसेनेचाच पाठपुरावा, मात्र “क्रेडिट” घेतले नाही…*

*जिल्हा परिषदचे सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब*

*कुडाळ  ः प्रतिनिधी*

राणेंच्या जिल्हा परिषदेेने करून दाखविले अशी वल्गना राणे समर्थक करीत असले,तरी दुसरीकडे ही जिल्हा परिषद भाजपचीच आहे,असे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सांगतात.त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्हा परिषद नेमकी भाजपची की राणेंची?, याचे उत्तर द्यावे, असा खोचक सवाल जिल्हा परिषदचे सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब यांनी केला आहे.दरम्यान पत्रकारांना लसीकरण करण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला.मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला अधिकार दिल्याने आम्ही त्याचे क्रेडिट घेतले नाही.त्यामुळे भाजपच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा बाऊ करू नये,असाही टोला त्यांनी लगावला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचे लसीकरण करण्यास सुरवात करण्यात आली.या पार्श्वभूमीवर राणेंच्या जिल्हा परिषदने करून दाखविले,असा दावा भाजपा पदाधिकार्‍यांकडुन करण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर श्री.परब यांनी हा प्रश्न केला आहे.पत्रकारांना लसीकरण करण्यात आले ही चांगली बाब आहे.आम्ही त्याचे स्वागत करतो.मात्र अशा गोष्टीचे आम्ही राजकारण करीत नाही.जिल्हा परिषद एकीकडे भाजपाची असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर सांगतात.मात्र दुसरीकडे राणे समर्थक ती राणेंची असल्याचा दावा करतात.त्यामुळे जिल्हा परिषद नेमकी कोणाची?,याचे उत्तर त्यांनी द्यावे .
ते पुढे म्हणाले,जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सावंत यांना त्यांचा मान ठेवून काही उपक्रमाचे उद्धाटन करण्याची संधी दिली जाते.त्यात खनिकर्म निधीतून पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या रुग्णवाहीकांचे लोकार्पण सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.मात्र त्यांनी त्या आपणच दिल्या,असे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!