*कोकण Express*
*मालवणच्या माजी नगरसेविका सुलभा बाणावलीकर यांचे निधन*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवणच्या माजी नगरसेविका श्रीमती सुलभा गुरुनाथ बाणावलीकर यांचे बुधवारी रात्री कुडाळ येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच सोमवारी त्यांचे पती गुरुनाथ बाणावलीकर यांचेही निधन झाले होते. त्यामुळे बाणावलीकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मालवण बाजारपेठेतील क्षुधा शांती निवास या हॉटेलमुळे बाणावलीकर कुटुंबीय घराघरात प्रसिद्ध होते. त्यांच्या दुकानातील बटाटावडा प्रसिद्ध होता. बाणावलीकर पती पत्नी हा व्यवसाय सांभाळत. सोमवारी गुरुनाथ उर्फ पप्पा बाणावलीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. तर बुधवारी रात्री त्यांच्या पत्नी श्रीमती सुलभा यांचीही प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कुडाळ मधील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. निलेश बाणावलीकर यांच्या त्या मातोश्री तर साप्ताहिक आघाडीचे संपादक नंदकिशोर महाजन यांच्या सासू होत.