*कोकण Express*
*आंब्रड येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन..*
*खा. विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांची उपस्थिती..*
*कणकवली ः ( संजना हळदिवे)*
श्री.भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोविड रुग्णांसाठी ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ग्राम विलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते तर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोविड रुग्णांसाठी बेड, तसेच जेवण, पाणी, बाथरूम इतर आवश्यक सोयी सुविधा याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
यावेळी आंब्रड सरपंच विठ्ठल तेली,शिवसेना विभागप्रमुख विकास राऊळ, उपसरपंच विजय परब, ग्रामसेवक सौ. कदम, तलाठी श्री. राठोड, सागर वाळके, प्रवीण भोगटे, मुख्याध्यापक श्री. राठोड,सौ. मुंज आदी उपस्थित होते.