*कोकण Express*
*सकाळचे बातमी अपडेट / ०३ जून गुरुवार*
◾ राज्याच्या रुग्ण संख्येत मोठी घट दिसत आहे ,काल 15 हजार रुग्णांची नोंद झाली – तर काल एका दिवसात 285 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला
◾ राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दीड वर्षापासून MPSC ची जाहिरात निघाली नाही – यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. –
◾ त्यामुळे आता राज्य सरकारने नवीन भरती काढण्याबरोबरच , वयोमर्यादेतही वाढ करावी – अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्स संघटनेने केली आहे
◾ ‘मातोश्री’ ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले असले तरी – आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही – देवेंद्र फडणवीस यांची माहिती
◾ राज्यातील बारावीच्या परीक्षांसदर्भातील आमचा प्रस्ताव – आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे – त्यांची बैठक दोन दिवसांमध्ये होईल , त्यानंतर परीक्षेबाबत निर्णय जाहीर होईल – असे काल वर्षा गायकवाड यांनी सांगितले
◾ राज्य शासन पेट्रोलवर सध्या २६ टक्के कर लावते, त्यातही 10 रुपये जास्तीचे आघाडी सरकार घेत आहे, ते त्यांनी कमी करावेत – आमदार रवींद्र चव्हाण यांची मागणी
◾ राज्यात ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेची घोषणा झाली आहे – यास्पर्धेत राज्यातील एकूण ६ महसूल विभागांमध्ये – प्रत्येकी ३ अशी एकूण , १८ पारितोषिकं दिली जातील –
◾ यात पहिल्या क्रमांसाठी ५० लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी २५ लाख आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १५ लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल – असे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले
◾ के. एस. होसाळीकर यांनी रात्री ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीप्रमाणे – कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात , पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे.