*कोकण Express*
*कनक रायडर्स कणकवलीच्या वतीने प्रणाली चिकटेचं करण्यात आलं स्वागत…*
*सात महिन्यात आठ हजार नऊशे किलोमीटरचा केलाय सायकल प्रवास*
*कणकवली ः प्रतिनिधी*
यवतमाळहून संपूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती करायला निघालेली प्रणाली चिकटे काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे दाखल झाली. निसर्ग संगोपनासाठी सायकल घेऊन महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या या निसर्गकन्येचं आज वरवडे संगमस्थळी कनक रायडर्स कणकवलीच्या वतीने स्वागत करण्यात आलं. या ध्येयवेड्या प्रवासाबद्दल तिला कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी तिनं आपला प्रवास, आपला उद्देश याबद्दल सांगितलं. निसर्ग संगोपनासाठी आणि शरीर तंदुरुस्त होण्यासाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे, असेही ती म्हणाली. यावेळी मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, कैलास सावंत, संजय बिडये, योगेश महाडिक, वैभव वाघाटे, चंद्रशेखर धानजी, उज्वला धानजी, संतोष कांबळे नितांत चव्हाण, मैत्रेयी चव्हाण, आर्यन कांबळे आदी उपस्थित होते.