*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेची तयारी विषयावरील वेबिनार संपन्न*
*फोंडाघाट ः (संंजना हळदिवे)*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या वरील वेबिनार 30 मे 2019 रोजी संपन्न झाला.
सदरचा वेबिनार कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट व एसीइ ऍकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला मा. अविनाश केसकर यांनी मार्गदर्शन केले. येत्या काळात स्पर्धा परीक्षा खूप महत्त्वाची आहे असे प्रतिपादन करताना स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे व्यासंग. आपल्या धेयापर्यंत पोचण्यासाठी अभ्यासातील सातत्य व नेमकेपणा आवश्यक असतो. भारंभार करण्यापेक्षा नेमकेपणा आवश्यक असतो.महत्त्वाचं पण नीट केलं तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे फारसे कठीण नाही. आता ग्रामीण भागात स्पर्धापरीक्षेची जनजागृती झाली असून ग्रामीण भागातील अधिकारीवर्ग दिसू शकेल. ग्रामीण भागात सोयी कमी असल्या तरी बुद्धिमत्ता कमी नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षा हा भविष्यातला निश्चित नोकरीचा एकमेव पर्याय राहिला असून त्याची तयारी करणे आपल्या हातात आहे आणि कष्टाला यश मिळते हा इतिहास आहे. असे प्रतिपादन विनंती केसरकर यांनी केले.
या वेबिनारला मितल केसरकर सुद्धा उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सतीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. संतोष रायबोले, डॉ. ताडेराव तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.