*कोकण Express*
*सरपंचांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा परीषद*
*शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवीी*
करोना उद्रेकाच्या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेमार्फत विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे.
गाव पातळीवर ग्राम सनियंत्रण समितीचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या सरपंचांची शासनाकडुन वेळोवेळी उपेक्षा केली जात आहे.मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परीषद या सर्व सरपंचांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.त्यात आज सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व सरपंचांचे लवकरच लसीकरण करण्यात येणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला.
यामुळे गावपातळीवर हिरारीने काम करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व सरपंचांच्या कामास बळकटी येणार असून सरपंचाना कोरोनापासूनचा धोका कमी होण्यास मदत होवून ग्रामपातळीवरील कोरोना लढ्यातील अग्रस्थानी राहणाऱ्या सरपंचांचे आरोग्य निरोगी रहाणार असल्याचा विश्वास डॉ.दळवी यांनी व्यक्त केला.