*कोकण Express*
*गोव्याहून थेट मध्यप्रदेशकडे वाहतूक करण्यात येणारी तब्बल ७२ लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथे पकडली..*
*बांदा ः प्रतिनिधी*
गोव्याहून थेट मध्यप्रदेशकडे वाहतूक करण्यात येणारी तब्बल ७२ लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथे पकडली आहे. त्यामुळे अवैध दारू वाहतुक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या अवैध दारू वाहतुक प्रकरणी मध्यप्रदेशच्या चौघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ८ लाखाच्या ट्रकसह तब्बल ८० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे यांनी दिली.
राकेश ओमप्रकाश पाल आणि ओमप्रकाश पाल (रा. इंदौर), दिलीप कमल रावत, रुपेश पंढरी सेन (रा. मध्यप्रदेश) अशी चौघा संशयितांची नावे आहेत. ही कारवाई रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाक्यासमोर करण्यात आली. यासाठी कोल्हापुर विभागाचे उपाययुक्त वाय. एम. पवार, अधिक्षक सिधुदुर्ग डाँ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी शैलेश चव्हाण, रमेश चंदुरे, संदिप कदम, शरद साळुंखे आदींनी सहकार्य केले.