*कोकण Express*
*हरकुळ बुद्रुक गावात लसीकरण व विलगी करण कक्षाचा संजना सावंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ…*
*कणकवली ः (संजना हळदिवे)*
हरकुळ बुद्रुक आरोग्य उपकेंद्रात आज लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मा.सौ .संजना सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग संजना सावंत स्वतः प्रत्येक ग्रामीण भागात उपस्थित राहून लसीकरणाचे नियोजन व वितरण पहात आहेत याबद्दल लसीकरणास उपस्थित ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच हरकुळ बुद्रुक परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून सेवा देता यावी याकरिता उर्दू हायस्कूल येथे ग्राम विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन देखील सौ. संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या विलगीकरण कक्षामध्ये 10 बेड उपलब्ध केलेल्या असून गरजेनुसार त्याची संख्या वाढवता येणार आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांना चोवीस तास गरम पाणी, सॅनिटायझर, मास्क, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाणी गरम करण्याची सुविधा, आंघोळीसाठी गिझर, प्रत्येक रुग्णला वाफेचे मशीन देण्यात येणार असून या गोष्टीची पाहणी देखील अध्यक्ष यांनी केली. लोकांच्या सहकार्यामुळेच व एकजुटीमुळे अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी असलेल्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करू शकतो असे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले.याप्रसंगी उपस्थित पंचायत समिती सदस्य दिव्या पेडणेकर मॅडम, सरपंच सौ गौसिया पटेल मॅडम ,माजी उपसभापती सन्माननीय वर्देकर सर ,श्री बुलंद पटेल, उपसरपंच श्री चंद्रकांत परब, ग्रामपंचायत सदस्य राजू पेडणेकर, माजी सरपंच आनंद ठाकूर, सोसायटी चेअरमन डॉक्टर अनिल ठाकूर, नित्यानंद चिंदरकर, डॉक्टर अरविंद मराठे, डॉक्टर तसलीमा शेख, ग्रामविस्तार अधिकारी श्री कवटकर, आरोग्य सेवक श्री मनोज सावंत, श्रीमती पाटकर मॅडम ,आयुब पटेल लियाकत पटेल इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.