_*‘पीएम केअर्स’ निधीला कर्मचाऱ्यांच्या पगारातून मिळाले १५७ कोटी; रेल्वेने दिली सर्वाधिक रक्कम*_
*रेल्वे कडून 93% निधी :*
▪️आपत्कालीन स्थिती निधीला (पीएम केअर्स फंड) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून १५७.२३ कोटी रुपयांचे दान देण्यात आले आहे.
▪️तर या निधीपैकी रेल्वे विभागाने ९३ टक्क्यांहून अधिक निधी दिला आहे.
▪️रेल्वे कडून पीएम केअर्सला १४६.७२ कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे.
✒️ *आरटीआयला दिलेल्या माहिती :*
पीएमओनं म्हटलं होतं की, “आरटीआय कायद्याच्या कलम २ (एच) नुसार ‘पीएम केअर फंड’ हे सार्वजनिक प्राधिकरण नाही.” मात्र, पीम केअर फंडाबाबत काही माहिती त्यांची वेबसाईट pmcares.gov.in वर दिसू शकते.
पीएम केअर्स फंडात केवळ केंद्रीय शिक्षण संस्थांकडूनच नव्हे तर कमीत कमी सात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सात अन्य प्रमुख वित्तीय संस्था आणि वीमा कंपन्या तसेच भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांनी मिळून २०४.७५ कोटी रुपये दिले.
🔅ही इतकी मोठी रक्कम सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापून या निधीत जमा झाली आहे.
*अन्य कोणी कोणी दिला निधी :*
● रेकॉर्डनुसार, एलआयसी, जीआयसी, एनएचबी या सार्वजनिक इन्शूरन्स कंपन्या आणि बँकेने देखील सुमारे १४४.५ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पीएम केअर फंडासाठी दिली आहे. ही रक्कम त्यांनी सीएसआर आणि इतर तरतुदींच्या माध्यमातून दिली आहे.