*कोकण Express*
*माजी जि. प. सभापती संदेश पटेल यांना मातृशोक*
*फोंडाघाट ः (संंजना हळदिवे)*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा फोंडाघाट माजी जि. प.सदस्य संदेश पटेल यांच्या आई प्रतिमा पांडुरंग सावंत – पटेल (८०)यांचे आज निधन झाले.
प्रतिमा पांडुरंग सावंत पटेल यांच्या निधनाने कुटूंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.