हॉटेल व्यवसायिक कृष्णा सावंत यांचे निधन!

हॉटेल व्यवसायिक कृष्णा सावंत यांचे निधन!

*कोकण Express*

*हॉटेल व्यवसायिक कृष्णा सावंत यांचे निधन!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

बिजली नगर येथील रहिवासी कृष्णा रामचंद्र सावंत (वय 75) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. कणकवली छत्रपती शिवाजी चौकात कित्येक वर्ष हॉटेल व्यवसायिक म्हणून ते परिचित होते. तसेच याच चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. एकेकाळी कै. श्रीधर नाईक यांच्या सोबत त्यांनी काही काळ काम केले होते. महामार्ग चौपदरी करणापूर्वी वाहन चालकांना त्यांच्या हॉटेलचा आधार होता. महामार्ग चौपदरीकरणात विस्थापित झाल्यानंतर मराठा मंडळ नजीकच्या कॉम्प्लेक्स मध्ये आमराई हॉटेल सुरू केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, विवाहीत मुली असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!