*कोकण Express*
*अशा’ प्रकारे ओळखाल लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे*
कोरोनाची कोणती लक्षणे लहान मुलांमध्ये असू शकतात? आरोग्य मंत्रालयाने याचे 4 टप्प्यात विभाजन केले आहे.
अशी मुले ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत.
असे चिमुकले ज्यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. त्यामध्ये ताप, खोकला, श्वास घेण्यात अडथळे, थकवा, अंगदुखी, सर्दी, घशात खव-खव, अपचन, स्वाद आणि वास न येणे इत्यादी.
ज्यांना मध्यम लक्षणे आहेत. मध्यम लक्षणांमध्ये पोट आणि आतड्यांसंबंधित विकार होई शकतात. परिस्थिती बिघडल्यास त्यांना गंभीर लक्षणांत सुद्धा समाविष्ट करता येईल.
Iगंभीर लक्षणे असलेली मुले. काही मुलांमध्ये मल्टी सिस्टम इन्फलेमेटरी सिंड्रोम नावाची समस्या होऊ शकते. यात मुलांना 100 डिग्रीपेक्षा अधिक ताप असतो. हा सिंड्रोम SARS-CoV-2 शी संबंधित आहे.
हलकी लक्षणे असलेल्या मुलांची काळजी कशी घ्याल?
घरातच त्यांचे ऑक्सिजन लेव्हल ताप चेक करत राहावे. एक चार्ट तयार करा आणि ताप येण्याचे प्रमाण आणि वेळ नोंद ठेवा.
तापासाठी पॅरासिटामोल देऊ शकता, घशात खव-खव किंवा सर्दीसाठी कोमट पाण्याच्या गुळण्या करायला लावाव्या.
पोट बिघडल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. अशात फळांचा रस आणि नारळ पाणी जास्तीत-जास्त द्या. आपल्याच मर्जीने अँटीबायोटिक देऊ नका.
अशा वेळी कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही.
मध्यम लक्षणे असलेल्या चिमुकल्यांची काळजी कशी घ्याल?
अशा मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल.
मुलांना पातळ जेवण द्यायला हवे. तान्ह्या मुलांसाठी आईचे दूधच उत्तम राहील.
मुले जेवत नसतील तर त्यांना पातळच खायला द्यावे.
ताप आल्यास पॅरासिटामोल देऊ शकता.
बॅक्टेरिअल इंफेक्शन झाल्यास एमोक्सिलिन दिले जाऊ शकते.
ऑक्सिजन लेव्हल घसरल्यास कृत्रिम ऑक्सिजनची देण्याची गरज राहील.
लक्षणे तशीच राहिल्यास कॉर्टिकोस्टरोइड्स दिले जाऊ शकतात
गंभीर लक्षणे असल्यास उपचार कसे?
छातीचा एक्स रे, कंप्लीट ब्लड काउंट, यकृत आणि मूत्रपिंडाची तपासणी करावी.
यकृत आणि मूत्रपिंडात काही इन्फेक्शन असल्यास रेमडेसिविर दिले जाऊ शकते.
वजनानुसार दिला जातो डोस
यात 3.5 – 4 किलो वजनी मुलांना पहिल्या दिवशी 5 एमजी, त्यानंतर 4 दिवस 2.5 एमजी
4-40 किलो वजनी मुलांना पहिल्या दिवशी 200 एमजी, नंतर 4 दिवस 100 एमजी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, फेविपिरावीर, आयवरमेक्टिन यांची गरज नाही.