राज्यात 15 जूनपर्यंत ! – ब्रेक द चेन अंतर्गत ,नवीन नियम जाहीर – प्रत्येकाने वाचा

राज्यात 15 जूनपर्यंत ! – ब्रेक द चेन अंतर्गत ,नवीन नियम जाहीर – प्रत्येकाने वाचा

*कोकण Express*

◾ *राज्यात 15 जूनपर्यंत ! – ब्रेक द चेन अंतर्गत ,नवीन नियम जाहीर – प्रत्येकाने वाचा* –

◾ आपण समजून घ्या कि- आता ‘ब्रेक दि चेन’चे नवे आदेश सर्वत्र एकसारखे लागू होणार नाहीत – म्हणजे आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर –

◾ तसेच तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून, निर्बंध लागू असतील – त्यामुळे आपण हे अपडेट्स दोन गटामध्ये समजून घेऊ

◾ यामध्ये पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेले जिल्हे – आणि पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या ,जिल्ह्याचा समावेश असेल

◾ *पॉझिटीव्हीटी 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ?*

🔰 आता पहा – ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोरोना पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल –

🔰 आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील – तर तिथे 12 मे 2021 च्या आदेशाप्रमाणे असलेल्या निर्बंधात , थोडी सूट मिळणार आहे

🔰 म्हणजे आता या भागातील – सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने ,जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु असतात – ती आता सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील

🔰 मात्र लक्षात घ्या , अशा भागात आता दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त – इतर कारणांसाठी येण्याजाण्यावर निर्बंध असतील

🔰 दरम्यान आवश्यक गटात नसलेल्या ,इतर दुकानांना उघडण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेईल – मात्र हे दुकाने सुद्धा 7 ते दुपारी 2 या वेळेतच सुरु करता येतील – तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.

🔰 याव्यतिरिक्त अशा भागांत अत्याआवश्यक नसलेल्या वस्तू देखील , ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील – तसेच शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील

🔰 तसेच कृषिविषयक दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी – स्थानिक व्यवस्थापन अधिकारी , या दुकानाची वेळ वाढवू शकते

🔰 मात्र लक्षात घ्या हे सर्व नियम – 10 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर असलेल्या जिल्ह्यासाठी आहेत – यापेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी दर असलेल्या भागाचे – नियम आपण येणाऱ्या मॅसेज मध्ये पाहू

📌 *राज्यातील लाॅकडाऊन बाबतचे* – हे नियम , प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाचे आहेत – आपण थोडासा वेळ काढून – इतरांना देखील अवश्य शेअर करा.

l

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!